Advertisement

दिवाळीतील हापूस आंब्याच्या पेटीला विक्रमी किंमत

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनी यांच्या स्टॉलवर या आंब्याची पूजा करण्यात आली.

दिवाळीतील हापूस आंब्याच्या पेटीला विक्रमी किंमत
SHARES

वाशी (vashi) येथील एपीएमसी फळ बाजारात यंदा दिवाळीच्या दिवशी देवगडमधून आलेल्या हापूस आंब्याच्या (alphonso mangoes) पेटीने विक्रमी दराचा नवा इतिहास रचला आहे.

देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी पाठवलेल्या सहा डझन हापूस आंब्यांच्या पेटीला तब्बल 25 हजार रुपयांचा दर मिळाला.

फळबाजारातील व्यापाऱ्यांच्या मते, हा वाशी एपीएमसीच्या (APMC) इतिहासातील हापूस आंब्याला मिळालेला सर्वाधिक उच्चांकी दर ठरला आहे. दरवर्षी साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ‘मुहूर्ताचा हापूस’ बाजारात दाखल होत असतो.

मात्र यंदा विशेष म्हणजे हा आंबा ऑक्टोबर महिन्यातच, तेही दिवाळीच्या (diwali) दिवशी दाखल झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनी यांच्या स्टॉलवर या आंब्याची पूजा करण्यात आली.

व्यापाऱ्यांच्या मते, दिवाळीच्या दिवशी हापूस आंबा बाजारात दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सदर आंबा त्यावेळी कच्चा होता, त्यामुळे पूजा करून तो पिकण्यासाठी ठेवण्यात आला होता. नंतर तो पिकल्यानंतर बोली लावण्यात आली आणि तेव्हाच या आंब्याच्या पेटीला विक्रमी 25 हजार रुपयांचा दर मिळाला, अशी माहिती व्यापारी हर्षल जेजुरकर यांनी दिली.

यापूर्वी कोकणातून एपीएमसी बाजारात दाखल होणाऱ्या ‘मुहूर्ताच्या’ हापूस आंब्यांना 20 ते 22 हजार रुपयांपर्यंत दर मिळत होता. त्यामुळे यंदा मिळालेला 25 हजार रुपयांचा दर हा आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम ठरला आहे.



हेही वाचा

पालिका निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून 50 हजार ईव्हीएम येणार

मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे पाणी बिल थकीत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा