Advertisement

फुकट्या प्रवाशांकडून २०० कोटींचा दंड वसूल

विनातिकीट प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा असल्यानं अशा प्रवाशांवर रेल्वे तिकीट तपासणीसांकडून दडात्मक कारवाई केली जाते.

फुकट्या प्रवाशांकडून २०० कोटींचा दंड वसूल
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वारंवार विनातिकीट प्रवास न करण्याचे आव्हान केलं जात. मात्र तरीही अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. तसंच, विनातिकीट प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा असल्यानं अशा प्रवाशांवर रेल्वे तिकीट तपासणीसांकडून दडात्मक कारवाई केली जाते. दरम्यान, रेल्वेनं अशा अनेक प्रवाशांवर कारवाई करत २०० कोटींचा दंड वसूल केला आहे.

विनातिकीट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने आक्रमक पवित्रा घेत तपासणी सुरू केली आहे. मागील वर्षभरात तब्बल २०० कोटींची दंड वसुली मध्य रेल्वेने केली आहे. एप्रिल २०२१ ते १६ मार्च २०२२ या कालावधीत एकूण ३३.३० लाख विनातिकीट आणि अनियमित तिकीट अशी प्रकरणे आढळली. या प्रकरणातून २००.८५ कोटींचा महसूल मध्य रेल्वेने मिळवला आहे. देशभरातील सर्व क्षेत्रीय रेल्वेच्या तुलनेत हा सर्वाधिक महसूल आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

मुंबई विभागाने सर्वाधिक ६६.८४ कोटी आणि मुख्यालयाच्या तपासणी पथकाने १२.४७ कोटींची वसुली केली. भुसावळने ५८.७५ कोटी, नागपूरने ३३.३२ कोटी, सोलापूरने १९.४२ कोटी आणि पुणे विभागाने १०.०५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

एसटी, बेस्टमध्ये ऑनलाइन-ऑफलाइन तिकीट किंवा पास घेण्यासाठी संपूर्ण लसीकरण प्रमापत्राची आवश्यकता नाही. लोकलमध्ये मात्र संपूर्ण लसीकरणाची अट कायम आहे. लसीकरणाबाबतच्या गैरसमजांमुळे नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. लस न घेतल्याने तिकीट व पासही मिळत नसल्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा