• नाल्याच्या श्रेयवादावरून रंगले राजकारण
  • नाल्याच्या श्रेयवादावरून रंगले राजकारण
  • नाल्याच्या श्रेयवादावरून रंगले राजकारण
  • नाल्याच्या श्रेयवादावरून रंगले राजकारण
SHARE

जनकल्याण नगर - निवडणूक जवळ आली आणि प्रत्येक पक्ष श्रेयाचं राजकारण करण्यात व्यस्त झालाय. असाच काहीसा हास्यास्पद प्रकार चारकोपमधील जनकल्याणनगरमध्ये पाहायला मिळाला. अथर्व कॉलेज ते जनकल्याण भूमिपार्क पर्यंतच्या नाल्याच्या भूमिपूजनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केल्याचं समोर आलंय आणि त्यावरूनच दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाचा राजकारण रंगतंय. काँग्रेसच्यावतीनं तर बॅनरबाजीच करण्यात आलीय. 2005 सालची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणून जनकल्याण नगर, छत्रपती शिवाजी राजे संकुल या परिसरात नाल्याच्या रुंदणीकरणाचे काम महापालिकेकडून घेण्यात आलेय. या रुंदीकरणासाठी पालिकेकडून 80 कोटींचा निधी पास झाला. मात्र सदर नाल्याचं श्रेय भाजप फुकट लाटतंय असा आरोप नगरेसविका गीता यादव यांनी केलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या