Advertisement

फॅशन स्ट्रीट बुधवारपासून तरुणाईसाठी खुला

दक्षिण मुंबईतील फॅशन स्ट्रीट बुधवारपासून सुरू होणार आहे. येथील दुकाने सशर्त उघडण्यास पालिकेकडून परवानगी देण्यात आली

फॅशन स्ट्रीट बुधवारपासून तरुणाईसाठी खुला
SHARES

दक्षिण मुंबईतील फॅशन स्ट्रीट बुधवारपासून सुरू होणार आहे. येथील दुकाने सशर्त उघडण्यास पालिकेकडून परवानगी देण्यात आली. त्यामुळे ६ महिन्यांपासून बेरोजगारीचा सामना करणाऱ्या येथील स्टॉलधारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मुंबईची ओळख असणाऱ्या महत्त्वाच्या स्थानांमध्ये फॅशन स्ट्रीट अबालवृद्धांमध्ये लोकप्रिय आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या बाजारपेठेत प्रवाहात असलेल्या फॅशनचे कपडे खरेदी करण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात इथं येत असते.

कोरोनामुळे दक्षिण मुंबईमधील हा बाजार बंद करण्याचा आदेश महापालिकेने १८ मार्चला जारी केला. त्यानंतर मुंबईत २४ मार्च रोजी लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू झाली. तब्बल ६ महिने फॅशन स्ट्रीटमधील दुकाने बंदच होती. लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करताना दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली.

ही बाब लक्षात घेऊन फॅशन स्ट्रीटमधील दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र फॅशन मार्केट अनुज्ञापनधारक वेल्फेअर असोसिएशनने पालिकेला पाठविले होते. या पत्राची दखल घेत फॅशन स्ट्रीटमधील दुकाने सशर्त सुरू करण्यास परवानगी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा