तीन मिनिटांच्या प्रवासासाठी 30 मिनिटं


  • तीन मिनिटांच्या प्रवासासाठी 30 मिनिटं
SHARE

लोअर परळ -  भारतमाता ते महादेव पालव मार्ग हे अंतर बाइक किंवा कारनं जायचं झाल्यास अवघं तीन मिनिटांचं. पण करी रोड पुलावरून जाणारा हा मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात आलाय. त्यामुळं स्थानिकांना हे अंतर पार करण्यासाठी चिंचपोकळी पुलावरून वळसा घालून जावं लागत असून, हे अंतर पार करण्यासाठी त्यांना 30 मिनिटं खर्ची करावी लागत आहेत. तीन मिनिटांच्या प्रवासासाठी 30 मिनिटं लागत असल्यानं करी रोड येथील स्थानिक रहिवाशी त्रस्त झालेत. विघ्नहर्ता, सुखकर्ता, कामगार स्व सदन, रामदूत परिसर आणि त्रिवेणी सदन येथील रहिवाशांनी या नो एंट्रीबाबत नाराजी व्यक्त केलीय. वाहतूक पोलिसांनी किमान स्थानिकांना तरी करी रोड पुलावरून प्रवेश द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या