Advertisement

निसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून १५० कि.मी. अंतरावर


निसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून १५० कि.मी. अंतरावर
SHARES

निसर्ग चक्रीवादळ आता मुंबईच्या किनारपट्टीपासून अवघ्या १५० किलोमीटर अंतरावर आहे. चक्रीवादळ वेगानं मुंबईच्या दिशेनं पुढे सरकत असल्याची माहिती समोर येत आहे. वादळ आणि किनारपट्टीमधील अंतर कमी होत असल्यानं मुंबईत पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. मुंबईतील विविध भागात जोरदार पाऊस पडत असून समुद्र किनारी राहणाऱ्या रहिवशांना सुरक्षेसाठी त्यांच स्थलांतरीत करण्यात येत आहे.

मुंबईला निसर्ग चक्रीवादळामुळं रेड अलर्ट जारी करण्यात आलं आहे. महापालिकेकडून वादळाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत असून, सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. नागरिकांना सतत आवाहन करत सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. मुंबईतील दादर, वरळी, माहिम, वर्सोवा, कोळीवाड्यातील किनारपट्टी नजीक राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणं हलविण्यात आलं आहे. 

दादर चौपाटी येथील किनाऱ्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना गोखलेरोड व भवानी शंकर रोड येथील महापालिकेच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आलं आहे. वर्सोवा कोळीवाड्यातील नागरिकांना भवन्स कॉलेजमध्ये स्थलांतरीत करण्यात आलं आहे. वादळाचा वेग अधिक असल्यानं संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत आहे. 

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बुधवारी निसर्ग चक्रीवादळ मुंबईत धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेद्वारे यापूर्वीच करण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे मुंबईच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

निसर्ग वादळ मुंबईच्या दिशेनं वेगानं सरकत असून, पहाटे ५ वाजताच्या मुंबईपासून हे वादळ २५० तर अलिबागपासून २०० किलोमीटर अंतरावर होते. त्यानंतर ६.३० वाजताच्या स्थितीनुसार वादळ मुंबईपासून २०० व अलिबागपासून १५५ किमी अंतरावर आलं. त्यानंतर ७.३० वाजता हे अंतर अनुक्रमे १९० आणि १४० किमी इतकं कमी झाल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा -

निसर्ग वादळाचा फटका; मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर वाढला

निसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून अवघ्या १९० कि.मी. अंतरावर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा