Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

Cyclone Tauktae : 'तौंते'मुळं राज्यात ६ जणांचा मृत्यू

या चक्रीवादळामुळं अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली तर राज्यात ६ जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे ८००० घरांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

Cyclone Tauktae : 'तौंते'मुळं राज्यात ६ जणांचा मृत्यू
SHARES

अरबी समुद्रातील तौंते चक्रीवादळाने रौद्ररूप धारण करत सोमवारी कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघरला चांगलच झोडपून काढलं. या चक्रीवादळामुळं अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली तर राज्यात ६ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले आहेत. तसंच, सुमारे ८००० घरांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

चक्रीवादळानं रविवारी केरळ, कर्नाटकसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना तडाखा दिला होता. गुजरातच्या दिशेने जाताना चक्रीवादळानं सोमवारी कोकणासह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये धुमाकूळ घातला.

चक्रीवादळामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा सुरळीत करण्याचं युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते. कोरोना रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये व झाला असल्यास तात्काळ तो सुरू करावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

रस्त्यावर पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीनं काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरू राहील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास सांगितले. मच्छीमारांच्या काही बोटींचे नुकसान झाले आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून परिस्थितीचा आढावा घेतला. चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी किनारपट्टी भागात के लेली तयारी, मुंबईतील परिस्थिती आदींबाबत मोदी यांनी माहिती विचारली. त्यावर ठाकरे यांनी राज्य सरकारने के लेल्या सज्जतेची माहिती दिली आणि राज्य सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असल्याचे सांगितलं.हेही वाचा -

Cyclone Tauktae : चक्रीवादळाचा मुंबईला फटका, तर ८ जण जखमी

Cyclone Tauktae : मुंबईत मे महिन्यात पावसाचा सर्वाधिक विक्रम


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा