Advertisement

cyclone tauktae : चक्रीवादळाचा मुंबईला फटका, तर ८ जण जखमी

मुंबईला तौक्ते चक्रीवादळाचा धोका नसला तरी, या वादळामुळं मुंबईत ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली. सखल भागांत पाणी साचलं.

cyclone tauktae : चक्रीवादळाचा मुंबईला फटका, तर ८ जण जखमी
SHARES

मुंबईला तौक्ते चक्रीवादळाचा धोका नसला तरी, या वादळामुळं मुंबईत ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली. सखल भागांत पाणी साचलं. दरम्यान अशाच घटनेत अनेकजण गंभीर जखमी ही झाले. चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस कोसळत असताना चेंबूर, शीव आणि अंधेरी परिसरात घडलेल्या निरनिराळ्या घटनांमध्ये ८ जण जखमी झाले. यापैकी तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर उर्वरित ५ जखमींना उपचार करुन घरी पाठविण्यात आले.

चेंबूर (पूर्व) :

चेंबूर (पूर्व) येथील सुमननगरमधील चिखलवाडीतील प्रियदर्शनी इमारतीमधील एका घरात दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याच वेळी भिंतीचा काही भाग कोसळून घरातील ४ जण जखमी झाले. यापैकी तिघांना माँ रुग्णालया, तर एकाला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. आश्रय माळी (२१), सुदर्शन माळी (२३), आकाश माळी (२६), सागर हनुमान (२२) अशी जखमींची नावे आहेत. आश्रयला माँ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सुदर्शन व आकाशवर उपचार करुन घरी पाठविण्यात आले. सागरला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

बोरिवली (पूर्व)

बोरिवली (पूर्व) येथील काजूपाडा परिसरातील अभिनव नगरमधील एका घरावर क्रेनचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत कुंदा सकपाळ (४०), सागर सकपाळ (२५), देवयानी सकपाळ हे तिघे जखमी झाले. स्थानिक रुग्णालयात उपचार करुन या तिघांनाही घरी पाठविण्यात आले.

अंधेरी (पश्चिम)

अंधेरी (पश्चिम) येथील गणेश नगर सोसायटीतील एक मजली इमारतीतील खोली क्रमांक १८ चा काही भाग कोसळून एक महिला जखमी झाली. या महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजतं.

शिवाय, मुंबईच्या काही ठिकाणी वाहनांवरही बॅनरचे होर्डिंग कोसळल्याच्या घटना समोर आल्या. तसंच झाडांची पडझड झाल्याचंही चित्र पाहायला मिळालं.  



हेही वाचा - 

Cyclone Tauktae : मुंबईत मे महिन्यात पावसाचा सर्वाधिक विक्रम

Cyclone Tauktae: तौंते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा