Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

cyclone tauktae: तौंते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने

अरबी समुद्रात निर्माण झालेलं आणि अतितीव्र स्वरुपाचं तौंते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकत आहे.

cyclone tauktae: तौंते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने
SHARES

अरबी समुद्रात निर्माण झालेलं आणि अतितीव्र स्वरुपाचं तौंते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. सध्या हे वादळ मुंबई किनारपट्टीच्या पश्चिमेला १२० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली.

हे चक्रीवादळ सोमवारी रात्री ८ ते ११ वाजेदरम्यान गुजरातच्या किनारपट्टीला धडकेल अशी शक्यता आहे. वादळाच्या प्रभावामुळे मुंबईत (mumbai) वाहत असलेल्या जोरदार वाऱ्यांचा वेग येत्या ४८ तासात मंदावेल, अशी माहिती देखील त्यांनी दिली. 

National Disaster Response Force (NDRF) च्या तीन टीम मुंबई उपनगरात तैनात आहेत. नौदलालाही अलर्ट राहायला सांगितलं आहे. भारतीय हवाई दलानं C-130J and a An-32 अशी दोन विमानं NDRF टीमसाठी ठेवली आहेत. मुंबई आणि अहमदाबादकडे यातून जवानांना आपत्कालीन स्थितीत नेलं जाईल.

वादळाच्या तडाख्याने मुंबई शहर आणि उपनगरातील ठिकठिकाणची झाडं उत्मळून पडली आहेत. वांद्रे-वरळी सी लिंक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. माहीम - शिवाजी पार्क - प्रभादेवी (सिद्धिविनायक मंदिर मार्ग) - हाजी अली जंक्शन, या मार्गाचा वापर करता येईल, परंतु अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर जाऊ नका असं आवाहन सर्वांना करण्यात आलं आहे. सोबतच पाणी भरल्याने मालाड सब वे वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

हेही वाचा-  मुंबई, ठाण्यात पुन्हा हायअलर्ट, IMDचा अतिमुसळधार पावासाचा इशारा

वादळी वारा आणि पावसामुळे वरळी, शिवाजी पार्क, अंधेरी सबवे, हिंदमाता, वरळी कोळीवाडा, पेडर रोड, यासह मुंबईच्या अनेक सखल भागांमधे पाणी साचलं. गेल्या २४ तासात मुंबईच्या शहर भागात ८. ३७ मिलिमीटर, पूर्व उपनगरात ६.५३ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात ३. ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

वादळी वारे आणि पावसामुळे १८२ झाडं कोसळल्याची माहिती प्रशासनं दिली. मध्य रेल्वे मार्गावर घाटकोपर आणि विक्रोळी दरम्यान रेल्वे रुळावर झाड पडल्यानं धीम्या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. हा अडथळा दूर झाल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. 

तर, सावधगिरीचा उपाय म्हणून म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

(cyclone tauktae moving towards gujarat coastline)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा