Advertisement

Cyclone Tauktae : मुंबई, ठाण्यात पुन्हा हायअलर्ट, IMDचा अतिमुसळधार पावासाचा इशारा

हवामान विभागानं (IMD)ने नवा (Revised alert by IMD Mumbai)इशारा देत मुंबईत अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Cyclone Tauktae : मुंबई, ठाण्यात पुन्हा हायअलर्ट, IMDचा अतिमुसळधार पावासाचा इशारा
SHARES

हवामान विभागानं (IMD)ने नवा (Revised alert by IMD Mumbai)इशारा देत मुंबईत अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तौंते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकत असलं, तरी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.

पुढच्या काही तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडेल, असं IMD ने सांगितलं आहे. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी कमाल ताशी १२० किमी पर्यंत पोहोचण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकर, ठाणेकरांनी सावध राहावं. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आणि रस्ते बंद झाले. Cyclone Tauktae सोमवारी रात्री गुजरातच्या किनाऱ्याच्या दिशेनं जाईल. रात्री उशीरा गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

National Disaster Response Force (NDRF) च्या तीन टीम मुंबई उपनगरात तैनात आहेत. नौदलालाही अलर्ट राहायला सांगितलं आहे. भारतीय हवाई दलानं C-130J and a An-32 अशी दोन विमानं NDRF टीमसाठी ठेवली आहेत. मुंबई आणि अहमदाबादकडे यातून जवानांना नेलं जाईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा सकाळी आढावा घेतला. तर दुपारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेत महत्त्वपूर्ण निर्देश दिले. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्षातून आढावा घेण्यात आला.

किनारपट्टीवरील वादळ परिस्थिती, बचाव व मदत कार्याच्या पूर्वतयारीची माहिती घेतानाच बचाव कार्यासाठी सतर्क राहण्याचे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश त्यांनी दिले.



हेही वाचा

Cyclone Tauktae: महाराष्ट्राला ‘तौंते’चा फटका; पंतप्रधानांचा उद्धव ठाकरेंना फोन

हॉटेल ट्रायडंटजवळ इमारतीचा भाग कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या सत्य

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा