Advertisement

हॉटेल ट्रायडंटजवळ इमारतीचा भाग कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या सत्य

ट्रायडंट हॉटेलजवळ (Trident hotel) झाडे आणि इमारतीचा काही भाग कोसळल्याचा एक व्हिडिओ व्हायरस होत आहे.

हॉटेल ट्रायडंटजवळ इमारतीचा भाग कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या सत्य
SHARES

तौक्ते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) पार्श्वभूमीवर काही फेक न्यूजदेखिल (Fake News) पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये नरीमन पॉइंटवर (Nariman Point) ट्रायडंट हॉटेलजवळ (Trident hotel) झाडे आणि इमारतीचा काही भाग कोसळल्याचा एक व्हिडिओ व्हायरस होत आहे. पण हा व्हिडिओ जुना असून अशी कोणतीही घटना मुंबईत घडलेली नसल्याचं समोर आलं आहे. (fake video)

तौक्ते चक्रीवादळानं मुंबई आणि किनारपट्टीच्या भागामध्ये मोठ्या वादळी वाऱ्यामुळं तडाखा बसला आहे. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पण फार मोठं नुकसान होणारी घटना अद्याप समोर आलेली नाही.

मात्र सोशल मीडियावर या वादाळाच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इमारतीच्या बाहेर उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांवर इमारतीचा भाग कोसळून त्या गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा प्रकार मुंबईतला नरीमन पॉइंटवरील ट्रायडंट हॉटेलजवळचा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता यापरिसरात अशी कोणतीही घटना घडलीच नसल्याचं समोर आलं. त्यामुळं सोशल मीडियावर व्हारल होत असलेला हा व्हिडिओ फेक असल्याचं समोर आलं आहे.

एका दुसऱ्या ट्वीटमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार हा व्हिडिओ मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यातला आहे. अरबमधील मदिना इथं ही घटना घडली होती, असा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला आहे.



हेही वाचा

Cyclone Tauktae: महाराष्ट्राला ‘तौंते’चा फटका; पंतप्रधानांचा उद्धव ठाकरेंना फोन

Cyclone Tauktae : सी-लिंक बंद, तर विमान सेवाही थांबली

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा