Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

Cyclone Tauktae : सी-लिंक बंद, तर विमान सेवाही थांबली

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईवर तौक्ते चक्रिवादळाचं संकट घोंघावत आहे. रविवारी रात्रीपासून मुंबईसह किनारपट्टीच्या भागात जोरदार वारेवाहत असून पावसानेही दमदार हजेरी लावली आहे.

Cyclone Tauktae : सी-लिंक बंद, तर विमान सेवाही थांबली
(Representational Image)
SHARES

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईवर तौक्ते चक्रिवादळाचं संकट घोंघावत आहे. रविवारी रात्रीपासून मुंबईसह किनारपट्टीच्या भागात जोरदार वारेवाहत असून पावसानेही दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत जोराचे वारे वाहत असून पाऊसही पडत आहे. मुंबईच्या अरबी समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेने जाणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वरळी-वांद्रे सी-लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून हा सी-लिंक बंद करण्यात आला आहे. पाऊस, सोसाट्याचा वारा आणि ढगाळ हवामान यामुळे मुंबई विमानतळावरील सर्व विमानांचे उड्डाण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

कुलाबा वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईतील वातावरण ढगाळ राहणार आहे. येत्या 24 तासात मुंबीत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबईत एकूण ५ ठिकाणी घरे पडणे आणि भिंती खचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या घटनांमध्ये कुणालाही मार लागला नाही. गेल्या २ दिवसांपासून मुंबईवर तौक्ते चक्रिवादळाचं संकट घोंघावत आहे. रविवारी रात्रीपासून मुंबईसह किनारपट्टीच्या भागात जोरदार वारेवाहत असून पावसानेही दमदार हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळी मुंबईत अवघ्या २ तासात १३२ झाडे उन्मळून पडली आहेत. त्यावरून तौक्ते वादळाचा तडाखा किती मोठा आहे हे दिसून येते.हेही वाचा -

Cyclone Tauktae : बोटी अथवा मासेमारी जाळ्यांचं नुकसान झाल्यास संपर्क साधण्याचं आवाहन

Cyclone Tauktae : चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी मुंबई सज्ज


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा