Advertisement

cyclone tauktae: महाराष्ट्राला ‘तौंते’चा फटका; पंतप्रधानांचा उद्धव ठाकरेंना फोन

वादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गसह अन्य ठिकाणी बरंचसं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून चौकशी केली आहे.

cyclone tauktae: महाराष्ट्राला ‘तौंते’चा फटका; पंतप्रधानांचा उद्धव ठाकरेंना फोन
SHARES

मुंबईसह महाराष्ट्राला (Maharashtra) ताैंते चक्रीवादळाचा (cyclone tauktae) जबरदस्त फटका बसत असून अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आतापर्यंत वादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गसह अन्य ठिकाणी बरंचसं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून चौकशी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा सकाळी आढावा घेतला. तर दुपारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेत महत्त्वपूर्ण निर्देश दिले. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षातून आढावा घेण्यात आला. किनारपट्टीवरील वादळ परिस्थिती, बचाव व मदत कार्याच्या पूर्वतयारीची माहिती घेतानाच बचाव कार्यासाठी सतर्क राहण्याचे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश त्यांनी दिले.

हेही वाचा- Cyclone Tauktae : वरळी सी फेस परिसराचा महापौरांनी घेतला आढावा

कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्रात घोंगावत होतं शनिवारी चक्रीवादळाने गोव्याला चांगलंच झोडपून काढलं. गोव्यानंतर रविवारी संध्याकाळी महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात तौंते चक्रीवादळाने धडक दिली. मुंबईपासून १२० किमी अंतरावर अरबी समु्द्रात घोंगावणारं हे वादळ हळहळू गुजरातकडे सरकत आहे. यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह राज्यातील इतर भागातही वादळाचा प्रभाव जाणवत आहे. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबई (mumbai) आणि राज्याच्या इतर भागात चांगलीच पडझड झाली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्गालाही चक्रीवादळाने तडाखा दिला. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यासहीत रायगड जिल्ह्यांतील १२,४२० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आलं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती जाणून घेतली. 

(PM narendra modi discuss with uddhav thackeray on cyclone tauktae disasters in maharashtra)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा