Advertisement

Cyclone Tauktae : चक्रीवादळामुळं मुंबईतील लसीकरण बंद

राज्यात एकीकडे कोरोनाचा हाहाकार असताना दुसरीकडे चक्रीवादळामुळे कोरोना लसीकरणाला ब्रेक लागला आहे.

Cyclone Tauktae : चक्रीवादळामुळं मुंबईतील लसीकरण बंद
SHARES

राज्यात एकीकडे कोरोनाचा हाहाकार असताना दुसरीकडे चक्रीवादळामुळे कोरोना लसीकरणाला ब्रेक लागला आहे. मुंबई, (mumbai) ठाण्यासह कोकण किनारपट्टीलगतच्या बहुतांश जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहे. पुढील २ दिवस ही लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णालय, ऑक्सिजन, व्हेंटिलरसह, आयसीयूची सोय करण्यात आली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेले आणि गेल्या दोन दिवसांपासून गुजरातच्या दिशेनं सरकत असलेले तौते चक्रीवादळ मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. मुंबईच्या समांतर समुद्रातून हे चक्रीवादळ पुढे जाणार असून, त्याचा परिणाम मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह राज्याच्या किनारपट्टी भागात बघायला मिळत आहे. मुंबईत एनडीआरएफ पथक तैनात करण्यात आली असून, रविवारी रात्रीपासून मुंबईसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा यासह इतर ठिकाणी पाऊस कोसळत आहे.

तौते चक्रीवादळ मुंबईला धडकणार नसले, तरी समुद्रातून गुजरातकडे सरकणाऱ्या या वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मुंबई, ठाणे जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशाराही दिलेला आहे. दरम्यान, चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकल्यानंतर त्याचा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात वादळी पाऊस झाला.

हवामान विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे तौते चक्रीवादळ मुंबईपासून १७० किमी अंतरावर आहे. हे वादळ हळूहळू पुढे सरकत असून, याचा प्रभाव मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, जळगाव यासह इतरही काही जिल्ह्यात दिसून आला आहे. रविवारी सायंकाळपासून मुंबईत पावसाला सुरूवात झाली. 



हेही वाचा -

Cyclone Tauktae : मुंबईतील ३ जंबो कोविड केंद्रातील एकूण ५८० रुग्णांचं स्थलांतर

Cyclone Tauktae : मुंबईसह या परिसरांना परिसराला सतर्कतेचा इशारा


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा