Advertisement

Cyclone Tauktae : वरळी सी फेस परिसराचा महापौरांनी घेतला आढावा

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar)यांनी वरळी सी फेस इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

Cyclone Tauktae : वरळी सी फेस परिसराचा महापौरांनी घेतला आढावा
SHARES

मुंबईत (Mumbai) तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar)यांनी वरळी सी फेस इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी सी फेस इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पालिकेचे इतर कर्मचारी सुद्धा उपस्थितीत होते.

शहरावर वादळाचे संकट जरी टळले असले तरी समुद्रकिनारी परिसरात जाऊ नये, गरजेचं काम असल्यास घराबाहेर पडावं, असं आवाहन मुंबई पालिकेकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून हा सी-लिंक बंद करण्यात आला आहे. पाऊस, सोसाट्याचा वारा आणि ढगाळ हवामान यामुळे मुंबई विमानतळावरील सर्व विमानांचे उड्डाण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

मध्य रेल्वेच्या घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान धीम्या मार्गावर झाड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे रेल्वेची ठाण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. पालिकेच्या वतीनं हे झाड काढण्याचं काम सुरू झालं आहे.

"तौक्ते" चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसंच मदत आणि पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील १२ हजार ४२० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आलं आहे अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली.



हेही वाचा

Cyclone Tauktae : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

Cyclone Tauktae : चक्रीवादळामुळं मुंबईतील लसीकरण बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा