Advertisement

Cyclone Tauktae : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी


Cyclone Tauktae : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी
SHARES

तौत्के चक्रीवादळामुळं येत्या काही काळात मुंबईतील पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघरसह इतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, माटुंगा, माहिमसह पश्चिम उपनगरात सर्वत्र जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे.

या वादळामुळं मुंबईत आतापर्यंत ३४ ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यात मुंबई शहर ११, पश्चिम उपनगर १७, पूर्व उपनगरात ६ ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी नाही. तौत्के चक्रीवादळाचा फटका संपूर्ण महाराष्ट्राला बसला आहे. रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर आता आणखी वाढला आहे.

मुंबईपाठोपाठ ठाणे, नवी मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईसह इतर ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

तौत्के चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी आर्थिक नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनानं मोठी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापनाची पथकं रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडच्या किनारपट्टीवर तैनात करण्यात आली आहेत. तसेच किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. समुद्र किनारी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



हेही वाचा - 

Cyclone Tauktae : मुंबईतील ३ जंबो कोविड केंद्रातील एकूण ५८० रुग्णांचं स्थलांतर

Cyclone Tauktae : मुंबईसह या परिसरांना परिसराला सतर्कतेचा इशारा


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा