Advertisement

मोठी बातमी! दादरच्या छबीलदास शाळेत चार सिलिंडरचा स्फोट


मोठी बातमी! दादरच्या छबीलदास शाळेत चार सिलिंडरचा स्फोट
SHARES

दादरमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दादरच्या छबीलदास शाळेत सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या शाळेत तब्बल चार सिलिंडरचा स्फोट झाला आहे. स्फोट अधिक तीव्रतेचा होता. या स्फोटात तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा सिलिंडरचा स्फोट नेमका कसा झाला? कशामुळे झाला? यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

एलपीजी सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या.  अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा