Advertisement

दादर आणि माहिममध्ये COVID 19 रुग्णांच्या आकड्यात वाढ

माहीम आणि दादरसह मुंबईच्या इतर भागात कोरोना आपले हातपास पसरत आहे.

दादर आणि माहिममध्ये COVID 19 रुग्णांच्या आकड्यात वाढ
SHARES

लॉकडाऊनवरील निर्बंध टप्प्याटप्प्यानं कमी होत गेले आहेत. त्यामुळे आता स्थानिक बाजारपेठा देखील सुरू झाल्या आहेत. पण यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. माहीम आणि दादरसह मुंबईच्या इतर भागात कोरोना आपले हातपास पसरत आहे. त्यामुळे आता हे परिसर हॉटस्पॉट ठरणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, धारावीतील रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आता धारावीत दिवसाला १ किंवा जास्तीत जास्त ३ रुग्ण सापडतात. यापूर्वी धारावीत दिवसाला १०० हून अधिक रुग्ण सापडायचे. पण आता इथली परिस्थिती कमालीची बदलली आहे.

पण आता माहीम आणि दादरसारख्या भागात कोरोनव्हायरसचे प्रमाण वाढत आहे. दादरमध्ये ८ जुलै रोजी  १ हाजर ०४४ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिन्यात याच भागात हा आकडा ४२० होता. त्याचप्रमाणे माहीममध्ये १ हजार २९९ इतकी रुग्ण वाढ झाली आहे. हा आकडा गेल्या महिन्यात ६५१ वर होता.


हेही वाचा : ठाण्यात ३१ ते ५० वयोगटात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण


जी-उत्तर प्रभागातील नागरी सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, “एप्रिल आणि मे मध्ये २० पेक्षा कमी रुग्ण आढळले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाऊन अंशत: शिथिल होऊ लागला. परिणामी लोकांनी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली. याशिवाय जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजीपाला आणि फळांच्या बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या. शहरातील विविध भागातून मजूर आणि व्यापारी परत कामावर आले.”.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कोरोनाव्हायरसच्या चाचणीच्या संपूर्ण प्रक्रियेमुळे अत्यंत सावध झाली आहे. चाचणीच्या संख्येत वाढ झाल्यानं कोरोनाव्हायरसचे रुग्ण वेळेवर ओळखण्यास मदत होत आहे. त्यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार होत आहेत.



हेही वाचा

रुग्णालयातील किती खाटा रिक्त? रोज माहिती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नवी मुंबईत अनलाॅकनंतर कोरोना रुग्णसंख्या, मृत्यूदरात मोठी वाढ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा