Advertisement

ठाण्यात ३१ ते ५० वयोगटात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ११ हजार ७०५ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ६२४५ रुग्ण बरे झाले आहेत.

ठाण्यात ३१ ते ५० वयोगटात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण
SHARES
ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ११ हजार ७०५ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ६२४५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ५०३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांमधील ४० टक्के रुग्ण हे ३१ ते ५० वयोगटातील आहेत. तर ५० वर्ष वयापुढील ३७ टक्के रुग्ण आहेत.


पालिकेने विश्लेषण केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. एकूण रुग्ण संख्येत पुरुष रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत ४०० हून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५० वर्ष वयापुढील २८९ रुग्ण आहेत.


वयोगटानुसार रुग्णसंख्या

वयोगट             पुरुष     महिला     टक्केवारी      मृत्यू

१० वर्षांपर्यंत     १४६         १२७         २.३               ०

११ ते २०             २४६         २१०       ३.९             १

२१ ते ३०             १०८१       ८१७       १६.२            १०

३१ ते ४०              १५७२      ७९०        २०.२            २५

४१ ते ५०              १४८६      ८५७         २०               ७२

५१ ते ६०               १४७७      ८२१         १९.६           १०९

६० वर्षांच्या पुढे      १२६२        ८०३        १७.६            १८०



हेही वाचा - 

मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा