Advertisement

दादर टीटी बस अपघातात १० जण जखमी

बुधवारी सकाळी दादर टीटी परिसरात बेस्टच्या तेजस्विनी बसला भीषण अपघात झाला.

दादर टीटी बस अपघातात १० जण जखमी
SHARES

बुधवारी सकाळी दादर टीटी परिसरात बेस्टच्या तेजस्विनी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्यांच्या संख्येत आता वाढ झाली असून, जखमींची संख्या आता १०वर पोहोचली आहे. भरधाव वेगानं येणाऱ्या बेस्ट बसनं डंपरला धडक दिली. या अपघातात ५२ वर्षीय बसचालक राजेंद्र काळे आणि ५७ वर्षीय कंडक्टर काशीराम धुरी यांच्यासह ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

१६ आणि १७ वयोगटातील २ तरुणांसह ४ जणांना किरकोळ दुखापत झाली अशी माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी सांगितलं. या अपघातातील जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सूरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दादर टीटी सर्कलजवळील सिग्नलवर डंपर थांबला होता. यावेळी मागून येणाऱ्या बेस्टच्या तेजस्वीनी बस चालकाचा ताबा सुटला आणि बस भरधाव वेगात पुढे उभा असलेल्या डंपरला धडकली. सदर बस मरोळ ते पायधुनी मार्ग क्रमांक २२ वर जात असताना दादर येथे हा अपघात झाला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा