अखेर प्रवाशाला पोलिसांच्या मदतीने सापडली बॅग

 Matunga
अखेर प्रवाशाला पोलिसांच्या मदतीने सापडली बॅग

दागिने आणि पैशाची बॅग विसरलेल्या प्रवाशाला त्याची बॅग माटुंगा पोलिसांनी परत केली आहे. या प्रवाशाचे नाव प्रशांत सतदवे असून, ते 6 लाख रुपयांचे दागिने आणि 60 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग प्रवासा दरम्यान विसरले होते. ते नागपुरचे रहिवासी असून, ते नातेवाईक आणि मित्र परिवारासोबत विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईत आले होते. यावेळी घाईघाईत असलेल्या सतदवे यांची बॅग रेल्वे स्टेशनवर राहिली. हा सगळा प्रकार दादर स्थानकावर घडला होता. मात्र माटुंगा पोलिसांनी ती बॅग स्वत:च्या ताब्यात घेऊन सतदवे यांच्या बॅगेत सापडलेल्या कार्डच्या सहाय्याने त्यांचा शोध घेत त्यांना त्यांची बॅग बुधवारी परत केली. आपली बॅग सर्व सामानासह सुखरुप परत केल्यामुळे सतदवे परिवाराने पोलिसांचे आभार मानले.

Loading Comments