रस्ता अंधारात

 Dalmia Estate
रस्ता अंधारात
रस्ता अंधारात
रस्ता अंधारात
See all

मुलुंड - पूर्वेकडील मिठागर रोड आणि मुलुंड रेल्वे स्थानकाला जोडणारा संत रामदास रोड अंधारात आहे. 4-5 दिवस झाले तरी या रस्त्यावरचे दिवे बंदच आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा अनेक इमारती, ठाकूर विद्यालय आणि प्रतिभा स्टडी सेंटर आहे. साहजिकच येथे नेहमीच वर्दळ असते. या संदर्भात येथील रहिवाशांनी महावितरणशी संपर्क करून तक्रारही केली आहे. पण अद्याप दुरुस्तीसाठी महावितरणकडून कुणीही आलेलं नाही. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने संध्याकाळी अंधार लवकर पडतो. त्यामुळे या रस्त्यावरील दिव्यांची दुरुस्ती लवकर व्हावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.

Loading Comments