SHARE

जोगेश्वरी रेल्वे स्थानकात एका ३८ वर्षाच्या महिलेनं धावत्या लोकसमोर येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मात्र त्याचवेळी त्या महिलेच्या १६ वर्षीय मुलीनं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लोकलची धडक बसल्यामुळे दोघीही गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात करण्यात आलं आहे. मात्र या महिलेच्या आत्महत्येच कारणं अद्याप समजलेलं नसून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.


घटना सीसीटीव्हीत कैद

पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी स्थानकात बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेनंतर दोघींना कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. लोकलची धडक बसल्यामुळे महिलेला उजवा हात गमावला असून मुलीच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या