Advertisement

राज्य सराकरी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ


राज्य सराकरी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ
SHARES

राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याचा दर १३२ वरून १३६ इतका करण्यात आला आहे. यासंबंधीचा शासननिर्णय वित्त विभागाने २१ सप्टेंबर रोजी जारी केला आहे.


थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश

महागाई भत्त्याची रक्कम १ ऑगस्ट २०१७ पासून रोखीने देण्यात येणार आहे, तर १ जानेवारी २०१७ ते ३१ जुलै २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येतील, असेही या शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे.

महागाई भत्त्याची रक्कम देण्यासंदर्भातील सध्याची तरतूद आणि कार्यपद्धती आहे तशीच यापुढेही चालू राहील, तसेच हे आदेश सुधारित वेतन संरचनेत वेतन अनुज्ञेय असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा