एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता

 Mumbai
एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता
Mumbai  -  

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने 1 जानेवारी 2016 पासून मूळ वेतनावरील महागाई भत्यात 6 टक्के वाढ केली होती. मात्र गेल्या वर्षभरापासून ही महागाई भत्त्त्याची रक्कम थकीत होती. अखेर ही थकबाकी एसटी कर्मचाऱ्यांना जून 2017 च्या पगारात मिळणार आहे.

एसटी कर्मचारी-अधिकारी यांना मिळणारा महागाई भत्त्याचा दर राज्य शासनानुसार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महागाई भत्ता 1 जानेवारी 2016 पासून 119 टक्क्यांवरून 125 टक्के करण्यात आला. जानेवारी ते ऑगस्ट 2016 या आठ महिन्यांच्या कालावधीतील थकीत महागाईची रक्कम कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक खर्चाला उपयोगी पडेल या रितीने विभागून सणासुदीला द्यावी अशी सूचना एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली होती. त्यानुसार 25 टक्के रक्कम 2016 ला गणेशचतुर्थीपूर्वी देण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित तीन महिन्यांचा भत्ता शाळा सुरू होण्यापूर्वी जून महिन्यात देण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे.

Loading Comments