Advertisement

आरेजवळ रिक्षाच्या धडकेत हरणाचा मृत्यू


आरेजवळ रिक्षाच्या धडकेत हरणाचा मृत्यू
SHARES

आरेमधील वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरे कॉलनीजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर एका हरणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री दीड वाजता घडली.

याबाबत मिळालेल्या प्रथमिक माहितीनुसार एका भरधाव रिक्षाची धडक बसल्याने या हरणाच्या डोक्याला जबर मार लागला होता. या घटनेत रिक्षाचालकही जखमी झाला असून त्याला नजिकच्या रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले आहे. स्थानिक नागरिकांनी जखमी हरणाला पाहताच त्याला रस्यावरून उचलून बाजूला ठेवले आणि पाणी पाजले. यानंतर त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जखमी हरणाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले, पण त्या हरणाचा रस्त्यातच मृत्यू झाला.

रुग्णालयात आणण्यापूर्वीच हरण मृत होते. त्याच्या शवविच्छेजवाची परवानगी पोलिसांकडून अद्याप मिळाली नाही. पोलिसांकडून परवानगी मिळाल्यानंतर पोस्टमार्टम करण्यात येईल. प्राथमिक माहितीनुसार हरणाच्या डोक्याला मार लागला आहे. पोस्ट मार्टमनंतर हरणाला अन्य ठिकाणी मार लागला आहे काय ते समजेल.
- डॉ शैलेश पेठे, पशु वैद्यकीय अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

आरे कॉलनीमध्ये बांधकाम, अनियंत्रित झोपटपट्टया, टोल फ्रीमुळे आरे कॉलनीमधून वाहतुकीची वाढ आणि पाण्यासाठी वन्य प्राण्यांना भटकावे लागत असल्याने अशा घटना होत आहेत. भविष्यात यावर नियंत्रण ठेवले नाही तर, अशा घटना वाढतच जातील.

- सुनील कदम, प्राणीमित्र

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा