आर्थिक महानगरांत मुंबई 31वी

 Pali Hill
आर्थिक महानगरांत मुंबई 31वी

मुंबई - ऑक्सफर्ड इकोनॉमिक्स 2015च्या अहवालानुसार संपूर्ण जगातल्या 50 मोठ्या आर्थिक महानगरांत मुंबईला 31 वं स्थान मिळालंय, तर दिल्लीला 30 वं स्थान मिळालंय. ऑक्सफर्ड इकोनॉमिक्स ही जगातील एक अग्रेसर स्वतंत्र सल्लागार कंपनी आहे. जी 200 देश, 100 उद्योग आणि 3000पेक्षा जास्त शहरांचं विश्लेषण करून अहवाल तयार करते. ऑक्सफर्डच्या अहवालानुसार मुंबईचं एक्सटेंडेड अर्बन एग्लोमरेशन (ईयूए) म्हणजेच विस्तारित मुंबईचं 2015 या वर्षासाठीचं जीडीपी 368 बिलिअन डॉलर आहे. या सर्व्हेत मुंबईच्या ईयूएमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, भिवंडी आणि पनवेलचा समावेश आहे. तर दुसरीकडे दिल्लीच्या ईयूएचा 2015चं जीडीपी 370 बिलिअन डॉलर आहे. दिल्लीच्या ईयूएमध्ये गुडगाव, फरिदाबाद, नोएडा आणि गाझियाबादचाही समावेश आहे.

Loading Comments