Advertisement

कांद्याचे दर घसरले; निर्यातीस परवानगीची मागणी

मुंबईसह राज्यभरात शंभरी घाटलेल्या कांद्याचे दर घसरले आहेत.

कांद्याचे दर घसरले; निर्यातीस परवानगीची मागणी
SHARES

मुंबईसह राज्यभरात शंभरी घाटलेल्या कांद्याचे दर घसरले आहेत. बाजारात ८० रुपये प्रति किलोनं कांदा विकला जात आहे. कांद्याचे भाव घसरल्यानं निर्यातीस परवानगी देण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं दर घसरत असल्याचं अन्न व नागरी पुरवठा खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी स्पष्ट केलं.

२ लाख क्विंटल

मुंबईसह ठाणे जिल्हा, पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये कांद्याचे किरकोळ बाजारातील दर ४०-६० रुपये प्रति किलोपासून असून नवीन कांदा या दरानं उपलब्ध होत आहे. घाऊक बाजारात दररोज सुमारे २ लाख क्विंटल कांदा उपलब्ध होत असून नोव्हेंबरच्या तुलनेत हे प्रमाण तिपटीनं वाढल्याची माहिती मिळते.

कांद्याचे दर चढेच

घाऊक बाजारात दर कमी असून व्यापाऱ्यांच्या नफेखोरीमुळं किरकोळ बाजारात अजूनही काही ठिकाणी कांद्याचे दर चढेच आहेत. केंद्र सरकारनं आणखी कांदा आयात केला असून, तो १५ जानेवारीच्या सुमारास बाजारात येणार आहे. हे लक्षात घेऊन कांद्याचे दर आणखी घसरण्याची भीती आहे. त्यामुळं आता निर्यातीवरील बंदी उठवून आयात रोखण्यात यावी, अशी मागणी किसान केली जात आहे.



हेही वाचा -

‘मनसे’ पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार?

उद्धव ठाकरेंचे सरकार गुडीपाडव्यापर्यंतच



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा