Advertisement

राणी बागेतील पेंग्विनला आता 'या' राज्यांमधूनही मागणी

दक्षिण मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय देशभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.

राणी बागेतील पेंग्विनला आता 'या' राज्यांमधूनही मागणी
SHARES

युवा सेना अध्यक्ष आणि माजीमंत्री आदित्य ठाकरे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या आणि राणी बागेतील पर्यटकांचे विशेषत: बच्चे कंपनीचे खास आकर्षण ठरलेल्या पेंग्विनची ख्याती सर्वदूर पोहोचली आहे. आता ओडिशा, गुजरातसह उत्तर प्रदेशातील गोरखपूर, लखनौ येथील प्राणीसंग्रहालयांनीसुद्धा मुंबईच्या राणी बागेतील काही पेंग्विन आमच्याकडेही पाठवा, अशी विनंती राणीबाग प्राधिकरणाला पत्रव्यवहाराद्वारे केली आहे. त्यास भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दुजोरा दिला आहे.

दक्षिण मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय देशभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. मुंबई महापालिकेच्या या उद्यान व प्राणी संग्रहालयात 15 पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर असे 13 जातीचे 84 सस्तन प्राणी, 19 जातींचे 157 पक्षी आहेत. या शिवाय 256 प्रजातींचे आणि 6611 वृक्ष-वनस्पतीसुद्धा आहेत.

रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत. त्यामुळे बच्चेकंपनीसह मोठ्यांचे ही राणी बाग आकर्षणाचे केंद्रस्थान ठरली आहे. राणी बागेत दररोज 7 ते 8 हजार पर्यटक भेट देतात.

गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यातून पेंग्विनची मागणी होत आहे. पर राज्यात पेंग्विन दिल्यास त्याठिकाणच्या प्राणी संग्रहालयामार्फत लांडगा, तरससह सिंह हे मिळावे, अशी अपेक्षा डॉ. त्रिपाठी यांनी व्यक्त केली. पेंग्वीनच्या आदानप्रदानासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची रितसर परवानगी घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.

या उद्यानात प्रवेशासाठी प्रती व्यक्ती रुपये ५० रुपये इतके शुल्क असून 3 ते 15 या वयोगटातील मुलांसाठी रुपये 25 रुपये इतके प्रवेश शुल्क आकारण्यात येते. तर आई - वडील आणि 15 वर्षे वयापर्यंतची 2 मुले अशा 4 व्यक्तींच्या कुटुंबासाठी 100 रुपये इतके एकत्रित शुल्क आकारण्यात येते.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात दररोज 7 ते 8 हजार पर्यटक भेट देतात. सुट्टीच्या दिवशी तर पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी होते. जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत 4 लाख 73 हजार 684 पर्यटकांनी भेट दिली. तर पर्यटकांच्या माध्यमातून 1 कोटी 88 लाख 92 हजार 692 रुपये महसूल मिळाला.हेही वाचा

मुंबई : पाणीकपातीबाबत बीएमसीचा मोठा निर्णय

मुंबई: दादरमधील 'या' फार्मसीत औषधांवर 25% सवलत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा