अनेक ठिकाणी ठराविक भागांची नावे बदलून विशिष्ट धर्माशी संबंधित अशी नावे ठेवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. अनेक परिसर आणि शहरांची नावेही बदलण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत मुंबईतील मुंब्रा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून मुंब्रा देवी करण्याची मागणी होत आहे. अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे. Demand to Mumbra station name change to Mumbra Devi station)
मुंब्रा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मोहित कंबोज यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यानंतर मुंब्रा रेल्वे स्थानकाबाबतचे राजकीय आंदोलन आणखी तीव्र झाले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून मोहित कंबोज यांनी मुंब्रा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून मुंब्रा देवी करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा