नाखुदा मोहल्ल्यातील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

  Mohammad Ali Road
  नाखुदा मोहल्ल्यातील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा
  मुंबई  -  

  मुंबई - डोंगरी, चिंचबंदर, नागदेवी रस्ता, युसूफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सिमेंट चाळ इथल्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणावर शुक्रवारी महापालिकेने कारवाई केली. जवळपास 250 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आलीय. महापालिकेच्या ‘बी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 1 जेसीबी आणि 20 कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

  सहाय्यक अभियंता (परिरक्षण) अतुल कोल्हे, अतिक्रमण निर्मूलन पथक, अनुज्ञापन खाते तसेच पायधुनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंडल कारवाई दरम्यान उपस्थित होते. फेरीवाल्यांमुळे रहिवाशांना ये-जा करण्यास अडचण होत होती. तेसच ट्रॅफिक समस्याही उद्भवत होती. त्यामुळे पालिकेने कारवाई करत अतिक्रमण हटवले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.