Advertisement

मुंबईत डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबईत मलेरियाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं चित्र आहे. मुंबईमध्ये गेल्या १२ दिवसांत मलेरियाचे २१० रूग्ण आढळून आले आहेत. तर डेंग्यूच्या एकूण ८५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ
SHARES

कोरोनासह मुंबईकरांना साथीच्या आजारांना तोंड द्यावं लागत आहे. दिवसेंदिवस साथीचे आजार डोकं वर काढत आहेत. मुंबईत मलेरियाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं चित्र आहे. मुंबईमध्ये गेल्या १२ दिवसांत मलेरियाचे २१० रूग्ण आढळून आले आहेत. तर डेंग्यूच्या एकूण ८५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मलेरिया आणि डेंग्यू यांच्याबरोबरच लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो, कावीळ तर स्वाईन फ्ल्यूचेही रुग्ण दिसून आल्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. मुंबई महापालिका कोरोना विरोधात उपाययोजना करत असतानाच जुलैपासून डेंग्यू, मलेरियासह पावसाळी आजारांनी डोकं वर काढलं आहे.

सुदैवाने, पावसाळी आजारांमुळे सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नसल्याची नोंद आहे. मुंबईत जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत डेंग्यूचे ३०५ रुग्ण आढळून आले आहे. त्यात ८५ रुग्ण या महिन्यातील आहेत. मुंबई महापालिकेने दिलेल्या अहवालानुसार, मुंबईमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी मुंबईत डेंग्यूचे १२९ रुग्ण आढळले होते.

मुंबईत सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. १ ते १२ सप्टेंबरदरम्यान डेंग्यूचे ८५ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या महिन्यात ही संख्या १४४ पर्यंत पोहोचली होती.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा