Advertisement

डेंग्युच्या अळ्यांमुळे होणार अटक !


डेंग्युच्या अळ्यांमुळे होणार अटक !
SHARES

मुंबई – सामान्य मुंबईकरांना आता कधीही तुरुंगात जावे लागू शकते. कारण घरात जर डेंग्युच्या अळ्या सापडल्या तर थेट खटले दाखल करण्यचा निर्णय पालिकेने घेतलाय. त्यामुळे तुमच्या घरात किंवा परिसरात जर डेंग्युच्या अळ्या सापडल्या, तर तुमच्यावरही न्यायालयात खटला दाखल होऊ शकतो.
डेंग्यूची साथ दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, डेंग्यूबाबत जनजागृती करूनही त्याचा फारसा सकारात्मक परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांत पालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यूच्या अळ्या सापडल्याप्रकरणी 13,500 जणांना नोटिसा पाठवल्या आहेत. यानंतरही उपाययोजना न करणाऱ्या 927 जणांविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. खटले दाखल झालेले दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई होणार असल्याचे पालिकेच्या वैदयकीय अधिकारी डाॅ. पद्मजा केसकर यांनी सांगितले आहे.
सप्टेंबरच्या दोन आठवड्यात डेंग्यूचे तब्बल 122 रुग्ण आढळले असून, दोन जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, पालिकेचे अधिकारी घरोघरी जाऊन औषधांच्या फवारणीबरोबर जनजागृती करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा