मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे भाज्यांच्या (vegetables) दर्जा (quality) आणि दर या दोन्हींवर परिणाम होत आहे. भिजल्यामुळे भाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात आवक वाढूनही भाज्यांचे दर (rate) गगनाला भिडले आहेत.
राज्यसह नवी मुंबई (navi mumbai), मुंबई (mumbai) उपनगरात मागील आठवड्यात पडलेल्या पावसाने भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
वाशीतील भाजीपाला बाजारात भाज्यांची 100-150 गाड्यांची आवक वाढली असून 712 गाड्या दाखल झाल्या होत्या. परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणावर भिजलेल्या भाज्या दाखल झाल्या. भिजल्यामुळे त्यामुळे भाज्यांचा दर्जा खालावला आहे.
वाटाणा, फरसबी, टोमॅटो, आणि मेथीच्या दरात वाढ झाली आहे. तर शिमला आणि हिरवी मिरचीच्या दरात घसरण झाली आहे. फरसबी अवघी 8 क्विंटल तर वाटाणा 248 क्विंटल , टोमॅटो 2033 क्विंटल, मेथी 28300 क्विंटलने दाखल झाली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात भाज्यांची 100- 150 गाड्यांची आवक वाढलेली आहे. परंतु पावसामुळे भाज्या खराब झाल्याने शेत मालाचा दर्जा घसरल्याने काही भाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे, अशी माहिती एपीएमसीमधील घाऊक व्यापारी बाळासाहेब बडदे यांनी दिली.
हेही वाचा