Advertisement

'एमडीएच' मसाल्यांचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

जगभरात प्रसिद्ध असलेल्या 'एमडीएच' मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं आहे.

'एमडीएच' मसाल्यांचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन
SHARES

जगभरात प्रसिद्ध असलेल्या 'एमडीएच' मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. गुरूवारी पहाटेच्या समुरास वृद्धापकाळानं ह्रदय बंद पडून त्यांचं निधन झालं. धर्मपाल गुलाटी हे मसाल्यांचा बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध होते.

धर्मपाल गुलाटी यांच्या निधनामुळं भारतानं एक अनुभवी आणि यशस्वी उद्योजक गमावल्याची भावना समाज माध्यमांवर उमटत आहे. महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट इथं झाला होता. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब दिल्लीत स्थायिक झालं. काही काळानंतर त्यांनी  मसाल्यांचा उद्योग सुरु केला. मागील अनेक वर्षांपासून 'महाशियां दी हट्टी' ही मसाल्याच्या पदार्थांचं उत्पादन करणारी कंपनी 'एमडीएच' या नावानं प्रसिद्ध आहे.

भारतात मसाल्यांच्या १५ कंपन्या आहेत. हजारच्या वर पुरवठादार आणि ४ लाख घाऊक विक्रेते एवढं मोठं जाळं एमडीएचनं विस्तारलेलं आहे. अमेरिका, कॅनडा, जपान, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड, युरोप, दक्षिण पूर्व आशिया, सौदी अरेबिया आदी देशांत ६२ हून अधिक उत्पादनांची विक्री होते.

चुन्नीलाल गुलाटी यांच्या अथक प्रयत्नांमुळं 'एमडीएच' कंपनीनं मसाल्याच्या पदार्थांमध्ये बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाशय धरमपाल गुलाटी यांचे पुत्र राजीव गुलाटी आता व्यवसायाचा हा पसारा समर्थपणे पुढे नेत आहेत. २०१९ साली गुलाटी यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म विभूषण प्रदान करुन सन्मानित करण्यात आलं होतं. गुलाटी हे त्यांच्या वैयक्तिक कमाईतील ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा दान म्हणून देत असे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा