Advertisement

नेमका विकास कुणाचा?


SHARES

धोबी घाट - मुंबईची जुनी ओळख असलेल्या धोबी घाटचं चित्र आता पालटणार आहे. ओमकार रियलटर्स अँड डेव्हलपमेंट आणि एलनटी कंपनीमार्फत एसआरए अंतर्गत या प्रकल्पाच्या पुनर्विकासाला राज्यसरकारनं संमती दिलीय. त्यानुसार 25 नोव्हेंबरला धोबी घाट पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात झालीय. या परिसरात 5 हजारापेक्षा जास्त झोपड्या आहेत. यातच साईबाबानगरमध्ये 1 हजार 510 झोपड्या, साने गुरुजीनगरमध्ये 960 झोपड्या, शक्तीनगरमध्ये 200 झोपड्या आणि जय भवानीनगरमध्ये 75 झोपड्या आहेत. पुर्विकासाच्या या प्रकल्पात साईबाबानगर आणि साने गुरुजीनगर या परिसरातील काही बिल्डरांनी आपल्या जागा लाटल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केलाय. यावर बिल्डरशी संपर्क केला असता त्यांनी बोलण्यासाठी विरोध केला. यामुळे धोबी घाटचा हा विकास म्हणजे नेमका कुणाचा विकास यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा