Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

ट्रॉमा रुग्णालयात लवकरच सुरू होणार डायलिसीस सेंटर


ट्रॉमा रुग्णालयात लवकरच सुरू होणार डायलिसीस सेंटर
SHARES

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा मनपा रुग्णालयातील डायलिसीस सेंटर येत्या तीन महिन्यांत सुरू करण्यात येईल, असं आश्‍वासन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी गृहनिर्माण, उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना दिलं आहे.


तक्रारीची घेतली दखल

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा या रुग्णालयात रुग्णांना भेडसवणाऱ्या विविध समस्यांबाबत स्थानिकांनी जोगेश्‍वरी विधानसभेचे आमदार तसंच राज्यमंत्री वायकर यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत राज्यमंत्री यांनी शुक्रवारी या रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी या रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी दोन वेळा टेंडर मागविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली.

 

नव्यानं टेेंडर मागवणार

योग्य प्रतिसाद मिळाला नसल्यानं आता पुन्हा नव्यानं टेेंडर मागवण्यात आली आहेत. ही टेंडर भरण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत असून आलेल्या टेंडरचा अभ्यास करून येत्या तीन महिन्यांमध्ये १० खाटांचे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर या रुग्णालयात सर्जिकल इंटेन्सीव केअर युनिट (एसआसीयु) आणि मेडिकल इंटेन्सिव्ह केअर यूनिट (एमआयसीयु) लवकर सरू करण्यात येणार असल्याची माहितीही रुग्णालय प्रशासनानं दिली.


रुग्णालयात फक्त ८४ कर्मचारी

सद्यस्थितीत या रुग्णालयात फक्त ८४ कर्मचारी काम करत असून जवळपास १४४ कर्मचाऱ्यांची या रुग्णालयात आवश्यकता आहे. या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात अशी मागणीही या निमित्तानं करण्यात आली. या रिक्त जागा भरण्यासाठी फाईलही मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी राज्यमंत्री यांना दिली. याची गंभीर दखल घेत राज्यमंत्री वायकर यांनी तात्काळ उपायुक्त सुनिल धामणे यांच्याशी संपर्क साधून रुग्णालयातील रिक्त जागा भरण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याची सूचना केली.


'तर कंत्राट रद्द करा'

या रुग्णालयातील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येईल, असं आश्‍वासनही धामणे यांनी राज्यमंत्री यांना दिले. या रुग्णालयात राजीव गांधी जिवनदायी योजनाही तात्काळ सुरू करण्यात यावी. त्याचबरोबर अतिदक्षता विभागामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांची यादी अतिदक्षता विभागाच्या बाहेर लावण्यात यावी, अशी सूचनाही राज्यमंत्री यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना केली. तसचं रुग्णालयातील साफसफाईचं कंत्राट ज्यांना दिलं आहे ते योग्यरित्या करत नसतील तर त्यांचं कंत्राट रद्द करावेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा