Advertisement

मनसे मोर्चावेळी 'हे' मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार


मनसे मोर्चावेळी 'हे' मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार
SHARES

पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (मनसे) आज मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात होईल. गिरगाव चौपाटीजवळील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर हा मोर्चा असणार आहे. मात्र, या मोर्चासाठी मुंबईतील काही मार्ग बंद केले आहेत. तर काही मार्गात बदल करण्यात आले आहेत.

वाहतुकीस मार्ग बंद

महापालिका मार्ग (दोन्ही वाहिनी) : सीएसएमटी जंक्शन ते मेट्रो जंक्शनपर्यंत असलेला मार्ग हा पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका इतर शासकीय आस्थापना यांची वाहने, न्यायालयीन वाहने, स्थानिक रहिवाशी तसेच इतर अत्यावश्यक सेवा पुरविणारी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंद असेल.

महात्मा गांधी मार्ग (दोन्ही वाहिनी) : ओसीएस जंक्शन ते मेट्रो जंक्शनपर्यंत असलेला मार्ग हा पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका इतर शासकीय आस्थापना यांची वाहने न्यायालयीन वाहने, स्थानिक रहिवाशी तसेच इतर अत्यावश्यक सेवा पुरविणारी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंद असेल.

शामलदास गांधी मार्ग

शामलदास गांधी जंक्शनवरुन प्रिन्सेस स्ट्रीट ब्रीजवरुन चौपाटीच्या दिशेला जाणारा मार्ग वाहतुकीस बंद

काळबादेवी रोड

वर्धमान जंक्शन ते मेट्रो सिनेमाकडे जाणाऱ्या वाहतुकीस प्रवेश बंद

एम.के. रोड येथील प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज खालून

शामलदास गांधी जंक्शनकडे येणारी वाहतूक बंद 


वळवण्यात आलेले मार्ग 

महापालिका मार्ग (दक्षिण वाहिनी) : महापालिका मार्ग उत्तरवाहिनीवरुन मेट्रो जंक्शनच्या दिशेने होणारी वाहतूक ही डी.एन.रोड उत्तरवाहिनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, सीपी ऑफिस कॉर्नर, डावे वळण, लोटी मार्गावरुन पुढे मार्गस्थ होईल.

महापालिका मार्ग (उत्तर वाहिनी) : महापालिका मार्ग दक्षिण वाहिनी सीएसएमटी जंक्शनच्या दिशेने होणारी वाहतूक ही लोकमान्य टिळक मार्गाने-क्रॉफर्ड मार्केट-उजवे वळण-डीएन रोड-सीएसएमटी जंक्शन पुढे मार्गस्थ

महात्मा गांधी मार्ग (उत्तर वाहिनी) : महात्मा गांधी मार्ग उत्तर वाहिनीवरुन मेट्रो जंक्शनचे दिशेने होणारी वाहतूक ही सीटीओ जंक्शन येथून डावे वळण-वीर नरीमन रोड-चर्चगेट जंक्शन-उजवे वळण-एम.के. रोड- आनंदीलाल पोदार चौक-आंनदीलाल पोदार मार्ग-मेट्रो जंक्शन पुढे मार्गस्थ होईल.

प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिजवरुन

प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिजवरुन चौपाटीच्या दिशेला जाणारी वाहने सीएसएमटी-डी.एन. रोडने-हुतात्मा चौक-उजवे वळण-वीर नरीमन रोडने पुढे चर्चगेट जंक्शन पुढे सरळ चौपाटीच्या दिशेला

वर्धमान जंक्शन

वर्धमान जंक्शन डावे वळणच-जुम्मा मस्जिद-उजवे वळण-लोकमान्य टिळक मार्ग-क्रॉफर्ड मार्केट-पुढे मार्गस्थ होईल

एम.के. रोड

एम.के. रोडने सरळ-आनंदीलाल पोद्दार चौक डावे वळण-आनंदीलाल पोद्दार मार्गाने मेट्रो जंक्शनकडे


या मार्गावर वाहने पार्क करण्यास मनाई

महापालिका मार्ग, बद्रुद्दीन तय्यबजी मार्ग, डी.एन.रोड, लो.टी. मार्ग, एम.जी.रोड, हजरीमल सोमानी मार्ग, श्यामलदास गांधी मार्ग वर्धमान जंक्शन ते एम.के.रोड जंक्शन

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा