ट्रेनवर रंगाचे फुगे फेकाल, तर शिक्षा भोगाल!

  Mumbai
  ट्रेनवर रंगाचे फुगे फेकाल, तर शिक्षा भोगाल!
  मुंबई  -  

  मुंबई - होळी आणि धुलिवंदनच्या दिवशी दरवर्षी मुंबईत लोकल ट्रेनवर रंगाचे आणि गटारातील पाण्याचे फुगे फोडले जातात. यात अनेक प्रवासी जखमी होतात. यावर्षी अशा घटनांना आळा बसावा म्हणून रेल्वे पोलिसांकडून विशेष जनजागृती करण्यात येत आहे. रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांनी संयुक्तपणे अशी जनजागृती केली आहे. रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या झोपड्या तसेच उघड्यावर राहणाऱ्या लोकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच लोकलवर फुगे फेकणाऱ्यांची माहीती पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

  "रेल्वेच्या बाजूला असणाऱ्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून फुगे मारू नका असे आवाहन केले आहे," अशी माहिती कुर्ला आरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर सांगळे यांनी दिली.

  "मुलुंड ते कुर्ला या परिसरातल्या झोपडपट्टीत बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत रेल्वेवर फुगे मारू नका अशी जनजागृती करण्यात आली आहे," असे जीआरपी पोलीस कर्मचारी सुनंदा साळुंखे यांनी स्पष्ट केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.