डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चेंबूरमध्ये जोरदार तयारी

 Chembur
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चेंबूरमध्ये जोरदार तयारी
Chembur, Mumbai  -  

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील चेंबूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पालिकेने बाबासाहेबांच्या जयंती निमित्त जोरदार तयारी सुरू केली आहे. दादर प्रमाणेच चेंबूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी अनुयायांची गर्दी असते. शिवाय बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनेक नेते मंडळी देखील याठिकाणी हजेरी लावतात. 

या सर्वांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पालिका दरवर्षी याठिकाणी तयारी करत असते. सध्या पालिकेकडून याठिकाणी साफ-सफाईचे काम सुरू असून, गेल्या पंधरा दिवसांपासून या उद्यानाच्या परिसरात रंगबेरंगी विद्युत रोषणाईला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे.

Loading Comments