Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक २०२१पर्यंत पूर्ण करू- मुख्यमंत्री

दादर चैत्यभूमी जवळील इंदू मिलच्या जमिनीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारण्यात आहे. या स्मारकाचं काम ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक २०२१पर्यंत पूर्ण करू- मुख्यमंत्री
SHARES

दादर चैत्यभूमी जवळील इंदू मिलच्या जमिनीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारण्यात आहे. या स्मारकाचं काम ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. या स्मारकासाठी २०१९ च्या अखेरीस ९८.८९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

कायदेशीर परवानगी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी विविध कायदेशीर परवानग्या घेणं बंधनकारक होतं. या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं १२ जानेवारी २०१८ रोजी घेतलेल्या बैठकीत स्मारकाच्या कामाच्या ७६३.०५ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजित खर्चाला मान्यता दिली असून, ९ फेब्रुवारी २०१८पासून स्मारकाचं काम सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितलं आहे.

तारांकित प्रश्न उपस्थित

डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी देण्याबाबत तसेच स्मारकाच्या कामाबाबत प्रकाश गजभिये, विक्रम काळे, हेमंत टकले, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, मुंख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचं भव्य स्मारक पूर्ण होणार का याकडं आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.



हेही वाचा -

'फिक्सर’ शुटिंग मारहाण: अभिनेत्री माही गिल आणि क्रू मेंबर्सनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

परागच्या मनात आहे तरी काय?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा