Advertisement

परागच्या मनात आहे तरी काय?

परागच्या मनात नेमकं काय सुरू आहे आणि तो कशाप्रकारची खेळी खेळत आहे ते पहायचं आहे.

परागच्या मनात आहे तरी काय?
SHARES

बिग बॉसच्या घरामध्ये गटबाजी होणं, दुसऱ्या गटातील सदस्यांच्या विरोधात योजना आखणं, आरोप-प्रत्यारोप करणं हे सगळं सुरूच असतं. बिग बॉस २ मध्ये पहिल्या आठवड्यातच असाच एक ग्रुप तयार झाला आणि ज्याला प्रेक्षकांनी देखील पसंती दिली. तो म्हणजे पराग, विणा, किशोरी, रुपाली आणि नंतर ग्रुपमध्ये आलेला शिव... परंतु वीणानं दुखावल्यानं आपण या ग्रुपमध्ये परत येऊ शकत नसल्याचं परागनं किशोरी आणि रुपालीला असं सांगितलं. 


नॉमिनेट करण्याची योजना

आता परागनं त्यांच्या ग्रुपमधील तिघींना हे सांगितले आहे कि, मी आपला ग्रुप सोडून कुठेही गेलेलो नाही. आपल्या ग्रुपमधील सदस्यांची संख्या कमी आहे. दुसरीकडे जाऊन हाय नंबर क्रिएट करून आपल्या ग्रुपची जे टार्गेट आहेत त्यांना मी एलिमनेट करणं गरजेचं असल्यानं तिकडे गेलो. मी माझ काम चालू केलं आहे. तिथं असताना त्यांच्या विरोधात खेळणार नाही आणि तुम्हाला नॉमिनेट करणार नसल्याचंही परागनं सांगितलं. अभिजीत केळकर बिग बॉसच्या घरात नसावा असं परागला वाटत आहे. त्यासाठी तो त्याच्या नव्या ग्रुपमधील सदस्यांना घेऊन त्याला नॉमिनेट करण्याची योजना आखत आहे. 


विणा दुखावली

परागच्या मते त्यानं त्यांचा ग्रुप तोडला आणि अभिजीतमुळेच त्यांच्या ग्रुपमधील सदस्य म्हणजेच शिव नॉमिनेट झाला. कॅप्टनसी टास्कच्या दरम्यान जे काही झालं ते चुकीचं होतं असं त्याचं म्हणणं आहे. मी आतल्या गाठीचा नाही आणि मी आपल्या चौघांना फाईनलमध्ये बघतो आहे असंही पराग म्हणाला, पण त्या दुसऱ्या ग्रुपला मी धोका देणार नाही. हे पराग बोलत असताना विणा उठून गेली, कारण ती दुखावली गेली. त्यामुळं परागच्या मनात नेमकं काय सुरू आहे आणि तो कशाप्रकारची खेळी खेळत आहे ते पहायचं आहे.


एक डाव धोबीपछाड

बिग बॉसच्या घरामध्ये सध्या एक डाव धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य सुरू आहे. याच टास्क दरम्यान एकमेकांच्या टीमला हरवण्यासाठी सदस्य बऱ्याच योजना आखताना दिसत आहेत. काल बिग बॉसनी सांगितल्याप्रमाणं आता प्रत्येक टीम त्यांना पटेल त्याप्रमाणे योजना आखून दुसऱ्या टीमला मात देण्याच्या प्रयत्नात आहे. प्रत्येक टीमनं दुसऱ्या टीमच्या मॅनेजरकडून त्या टीमनं तयार केलेले कपडे अॅप्रुव्ह करून घ्यायचे आहेत. हेच लक्षात घेता धुतलेले कपडे वाळवल्यानंतर त्याला इस्त्री करून तयार करायचे आहेत. त्यामुळे शिव विरोधी टीमची इस्त्रीच चोरणार आहे. आता ही इस्त्री ते बळाचा वापर करून परत मिळवतात कि युक्तीचा वापर करून ते पहायला मिळणार आहे.


वादाची ठिणगी

या टास्कमध्ये परागनं स्वत:लाच मॅनेजर बनवल्यानं दोन्ही टीममध्ये वादाची ठिणगी पडली आहे. या टास्कमध्ये मॅनेजरमध्ये झालेल्या डीलप्रमाणं विणाच्या टीमनं परागच्या टीमला अॅप्रुव्ह झालेले दोन कपडे द्यायचे आहेत; परंतु विणाच्या टीमनं यावर उत्तम योजना आखली आहे. टीम परागला सांगणार आहे की, आमच्या टीमचा मॅनेजर सुट्टीवर आहे आणि यावरूनच विणा–परागमध्ये वाद होणार आहे. ज्यामध्ये शिव साम, दाम, दंड, भेद हे शब्द मोठ्या आवाजात बोलल्यानं समोरच्या टीमची चिडचिड झाली. त्यामुळं परागचा राग अनावर झाला आणि तो देखील शिवला टक्कर देत साम, दाम, दंड, भेद असं मोठ्या आवाजात बोलू लागला.हेही वाचा  -

प्रेमात कशाला वेटींग? मैत्रीणंच लावतेय सेटींग

EXCLUSIVE : कचरा डेपोमध्ये शूट होतोय मराठमोळा 'ब्लँकेट'
संबंधित विषय
Advertisement