Advertisement

दारूच्या नशेत थेट रेल्वे खांबावर चढला आणि थोडक्यात वाचला

मुंबईत एक ३० वर्षीय तरूण दारुच्या नशेत थेट ओएचईला आधार देणाऱ्या रेल्वेच्या खांबावर चढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दारूच्या नशेत थेट रेल्वे खांबावर चढला आणि थोडक्यात वाचला
SHARES

दारुच्या (liquor) नशेत आपण काय करत आहोत याची जाण कोणालाच नसते. त्यामुळं अनेकदा अपघात होतात, तर अनेक जण वादाला कारणीभूत ठरतात. मात्र, मुंबईत एक ३० वर्षीय तरूण दारुच्या नशेत थेट ओएचईला आधार देणाऱ्या रेल्वेच्या (railway) खांबावर चढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाकीर सलीम कुरेशी असं त्याचं नाव असून, तो हार्बर रेल्वे (harbour railway) मार्गावरील सॅन्डहर्स्ट रोड (sandhurst road) स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे खांबावर चढला.

रेल्वेच्या खांबावर चढल्यानं विजेचा धक्का लागून झालेल्या अपघातात शाकीर जखमी झाला आहे. सॅन्डहर्स्ट रोडजवळ वाडीबंदर इथं उतरणाऱ्या पुलालगत रेल्वेला विद्युत पुरवठा करणाऱ्या ओव्हर हेड वायर (OHE) आहेत. त्याला आधार देण्यासाठी खांब उभारले आहेत. रविवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास हा तरुण नशेत खांबावर चढला.

लोकलसेवा सुरू असल्यानं ओएचईमधून उच्च दाबानं विद्युत प्रवाह (electric supply) सुरू होता. रूळांच्या बरोबर वर असलेल्या खांबावर हा तरुण लटकत होता. यावेळी त्याच्या पायाचा स्पर्श ओएचईला झाल्याने शॉट सर्किट (short circuit) झालं. त्यामुळं विजेचा धक्का बसून तो तरुण रुळांवर पडला.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा जवान आणि रेल्वे पोलिस (railway police) घटनास्थळी धाव घेत तातडीनं शाकीरला जे. जे. रुग्णालयात (j j hospital) दाखल केले. शाकीर कुरेशी हा भायखळा फळबाजारातील (byculla fruit market) विक्रेता असून, नशेत तो खांबावर चढल्याची प्राथमिक माहिती आहे.



हेही वाचा -

तब्बल ५६ तासांनी सिटी सेंटर मॉलमधील आग नियंत्रणात

महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस किती? मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांच्या बैठकीत होणार निर्णय


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा