Advertisement

मेट्रोच्या कामांमुळे यंदाही गणरायांचं आगमन खड्ड्यांतून

गणेशोत्सवापूर्वी आयोजित केलेल्या महापालिकेचे अधिकारी आणि समन्वय समितीच्या बैठकीला चक्क मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात मेट्रोच्या मार्गावरून येणाऱ्या गणरायांना खड्ड्यांतून यावं लागणार, असं चित्र आहे.

मेट्रोच्या कामांमुळे यंदाही गणरायांचं आगमन खड्ड्यांतून
SHARES

मुंबईत सर्वाधिक रस्ते हे मेट्रोच्या कामांमुळे खराब होऊन त्यावर खड्डयांचं साम्राज्य पसरलं आहे. परंतु, गणेशोत्सवापूर्वी आयोजित केलेल्या महापालिकेचे अधिकारी आणि समन्वय समितीच्या बैठकीला चक्क मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात मेट्रोच्या मार्गावरून येणाऱ्या गणरायांना खड्ड्यांतून यावं लागणार, असं चित्र आहे.


महापालिका मुख्यालयात बैठक

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि अन्य मंडळे तसंच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलिस प्रशासन यांच्यासह विविध प्राधिकरणांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक गुरुवारी संध्याकाळी महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात पार पडली.


खड्ड्यांबाबत व्यक्त केली चिंता

यावेळी महापालिकेतर्फे दरवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱ्या गणेशोत्सव - २०१८ या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन मुंबईचे महापौर विश्वीनाथ महाडेश्वहर यांच्या हस्ते झालं. या बैठकीमध्ये समन्वय समितीच्या बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबांवकर यांनी मुंबईतील खड्ड्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.


महापौरांचे निर्देश

मुंबईतील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवले कसे जाणार असा सवाल त्यांनी केला. यावर श्री गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे प्रशासनाने पूर्ण भरून घ्यावे. शिवाय महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवता येईल, याचंही नियोजन करण्याबाबत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी निर्देश दिले.


महापालिका आयुक्तांची ग्वाही

गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम प्रशासनाकडून पूर्ण केलं जाईल. संबंधित गणेशमंडळानी खड्ड्यांबाबत त्या त्या विभागाचे उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांकडे आपली तक्रार नोंदवल्यानंतर लगेच खड्डे बुजवले जातील, अशी ग्वाही महापालिका अतिरिक्त आयुक्त अजोय मेहता यांनी दिली. तसंच मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत वाहतूक पोलिस समन्वय साधून खड्डे बुजवून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

बैठकीला 'यांची' उपस्थिती

या बैठकीला उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेता विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, महापालिका आयुक्त अजोय मेहता, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती (उपनगरे)चे अध्यक्ष तथा माजी मंत्री लिलाधर डाके, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरनोबत, उप आयुक्त (परिमंडळ - २) आणि गणेशोत्सवाचे समन्वयक नरेंद्र बरडे, सर्व परिमंडळीय उप आयुक्त व संबंधित सहाय्यक आयुक्त आणि पालिका अधिकारी उपस्थित होते.


हेही वाचा -

गणेशोत्सवातच खड्डे का बुजवले जातात ? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा