इस्टर प्रार्थनांना आडकाठी नाही

  Mumbai
  इस्टर प्रार्थनांना आडकाठी नाही
  मुंबई  -  

  येत्या 16 एप्रिल रोजी इस्टर आहे. मात्र यावेळी ख्रिश्चन शाळांना खुल्या जागेत इस्टरची प्रार्थना करण्याची परवानगी नाकारल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र मुंबई पोलिसांनी अशा प्रकारची कोणतीही परवानगी नाकारली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

  मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये इस्टर प्रार्थनेला नेहमीप्रमाणे परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. विशेष म्हणजे त्यावर मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना या प्रकरणात लक्ष घालून आवश्यक ती पावले उचलावीत असा शेराही मारला होता. मात्र मुंबई लाइव्हनं पोलिसांकडे याबाबत विचारणा केली असता अशी कोणतीही परवानगी पोलिसांनी नाकारली नसल्याची माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली.

  ऑगस्ट २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने शांतता क्षेत्रात लाऊडस्पिकरना बंदी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने देखील अधिसूचना काढून पोलिसांना शांतता क्षेत्रात लाऊडस्पिकरना परवानगी न देण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभीमीवर इस्टर प्रार्थनेला खुल्या जागेत परवानगी नाकारत बंदिस्त जागेतच प्रार्थना करावी अशा प्रकारचे बंधन घालण्यात आल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.