मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ‘महामतदार जागृती’ अभियान

यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढाण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदार जागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

SHARE

यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढाण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदार जागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मंगळवारी निवडणूक आयोगाकडून आयोजित केलेल्या 'महामतदार जागृती अभियाना'ला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी हिरवा कंदील दाखवला. तसंच, दक्षिण मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जळगाव, धुळे आणि कल्याण या मतदारसंघांमध्ये हे अभियान रावबिण्यात येणार आहे.


मतदार जागृती अभियान

कार्यक्रमाचा प्रारंभ अश्वनी कुमार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. हवेमध्ये फुगे सोडून महामतदार जागृती अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचा संदेश दिला गेला. त्याशिवाय संगीत आणि नाट्य विभागातर्फे मतदान जनजागृतीसाठी 'एक पाऊल लोकशाहीचे' हे पथनाट्य आणि लोकसंगीत कायक्रमाचं आयोजनही यावेळी करण्यात आलं होतं.

दक्षिण मुंबईत सुरू झालेलं अभियान ५ एप्रिलला संपणार आहे. तसंच, ३ ते ९ एप्रिल रोजी पुण्यात राबविण्यात येणार आहे. ८ ते १० एप्रिल रोजी नागपूर आणि चंद्रपूर येथे राबविण्यात येणार आहे. सोलापूरमध्ये ११ ते १७ रोजी आणि सातारा, औरंगाबाद, जळगाव येथे १६ ते २२ रोजी राबविण्यात येणार आहे. त्यानंतर या अभियाचा दुसरा टप्पा २५-२८ एप्रिल रोजी सीएसएमटी येथे सुरू करण्यात येणार आहे.हेही वाचा -

'उर्मिला यांना राजकारणातलं शून्य ज्ञान' – गोपाळ शेट्टी

सीएसएमटी स्थानकातील पादचारी पुलाच्या पायऱ्या दुरुस्तीसाठी बंदसंबंधित विषय
ताज्या बातम्या