'उर्मिला यांना राजकारणातलं शून्य ज्ञान'– गोपाळ शेट्टी

लोकसभा निवडणूकीसाठी मुंबईत मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी उत्तर मुंबई मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

SHARE

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी उत्तर मुंबई मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी निवडणूक लढवणार आहेत, तर यंदा त्यांना याच जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार उर्मिला मातोंडकरचं आव्हान असणार आहे.


'भोली भाली लडकी'

दरम्यान, यावेळी गोपाळ शेट्टींनी माध्यमांशी बोलताना, उर्मिलाचा उल्लेख त्यांनी 'भोली भाली लडकी' असा केला. त्याशिवाय, 'उर्मिला यांना राजकारणातलं शून्य ज्ञान आहे, असं म्हटलं. त्यामुळं उर्मिला मातोंडकर यांचं आव्हान आपल्यासमोर आहे, हे मी मानत नाही. त्यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे, त्या माझ्या शत्रू नाहीत मात्र, राजकारणातलं त्यांना काहीही कळत नाही त्या झीरो आहेत' असं देखील म्हटलं आहे.


उमेदवारी अर्ज दाखल

गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बोरीवली ते मालाड या भागात रॅली काढली होती. या रॅलीमध्ये भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. तसंच, शिक्षण मंत्री विनोद तावडे, आमदार अतुल भातखळकर, आ. मनीषा चौधरी, आ. विलास पोतनीस या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.हेही वाचा -

सीएसएमटी स्थानकातील पादचारी पुलाच्या पायऱ्या दुरुस्तीसाठी बंदसंबंधित विषय
ताज्या बातम्या