Advertisement

सीएसएमटी स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद

मध्य रेल्वेनं सीएसएमटी स्थानकातील हार्बरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील पुलाच्या पायऱ्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं या पुलावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ - ३ मधील जिना ते प्लॅटफॉर्म १ पर्यंतचा मार्ग बंद करण्यात आला आहे.

सीएसएमटी स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद
SHARES

हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वेनं रेल्वे मार्गावरील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या मालाड, दादर, मुंबई सेंट्रल आणि मध्य रेल्वेच्या डोंबिवली आणि कुर्ला स्थानकातील पूल दुरूस्तीसाठी बंद करण्यात आला. अशातच, आता मध्य रेल्वेनं सीएसएमटी स्थानकातील हार्बरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील पुलाच्या पायऱ्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं या पुलावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ - ३ मधील जिना ते प्लॅटफॉर्म १ पर्यंतचा मार्ग बंद करण्यात आला आहे. 


अचानक पुलाच्या पायऱ्या बंद

मध्य रेल्वेनं मंगळवारी प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ च्या जिन्याकडून प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या जिन्याकडे जाण्यापर्यंतचा मार्ग बंद केला. या जिन्याची दुरुस्ती २६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. दरम्यान, अचानक या पुलाच्या पायऱ्या बंद केल्यानं तसंच, प्रवाशांना याबाबत माहिती न दिल्यानं प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. याबाबत माहिती नसल्यामुळं प्रवाशांना पुन्हा वळसा घालून सीएसएमटीच्या दुसऱ्या टोकाकडील पालिकेच्या भुयारी मार्गातून जावं लागलं. 

काही दिवसांपूर्वी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मध्य रेल्वेनं भांडुप, विक्रोळी, दिवा, कल्याण, कुर्ला स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद केले. त्याशिवाय कुर्ला स्थानकातील पूर्व आणि पश्चिमेस जोडणारा पादचारी पूल देखील बंद करण्यात आला आहे.हेही वाचा -

राज्यातील मतदान केंद्रांमध्ये २ हजारांनी वाढRead this story in English or हिंदी
संबंधित विषय