Advertisement

वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका


वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका
SHARES

मुंबई - दादर पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि दादर पश्चिमेकडील सेनापती बापट यांना जोडणारा पूल म्हणजे एलफिस्टन रोड पूल. या पुलावर होणाऱ्या वाहतुक कोंडीचा मुंबईकरांना कायमच सामना करावा लागतो. मात्र या वाहतुक कोंडी पासून आता सुटका होणार आहे. कायम होणारी ही वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पालिकेने चौपदरीकरणाचा निर्णय घेतलाय. आणि यासंबधीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिलेत. आयुक्तांनी मंगळवारी दादर-परळसह काही भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी हे आदेश दिले. सध्या हा पूल दोन मार्गिकेचा असून, वाहतुकीसाठी तो अपुरा पडत आहे. त्यामुळे चौपदरीकरणाचा निर्णय पालिकेने घेतला आहे. हे चौपदरीकरण झाल्यास एलफिन्स्टन रोडवरील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा