आपल्या पदाला पूर्ण न्याय द्या- डॉ. जगन्नाथ हेगडे

Prabhadevi
आपल्या पदाला पूर्ण न्याय द्या- डॉ. जगन्नाथ हेगडे
आपल्या पदाला पूर्ण न्याय द्या- डॉ. जगन्नाथ हेगडे
See all
मुंबई  -  

राजकारण, समाजकारण, सरकार यामध्ये आपण कोणत्याही पदावर कार्यरत असू, तेव्हा आपण आपल्या पदाला पूर्ण न्याय देणे गरजेचे असते. ज्या जबाबदाऱ्या झेपत नाहीत, त्या जबाबदाऱ्या घेऊ नयेत. कार्डवर लिहिण्यासाठी कोणतेही पद असणे गरजेचे नसते. त्या पदावर राहून आपल्या कामातून आपला ठसा उमटवत या समाजातील लोकांना आपला कसा उपयोग होईल? याकडे लक्ष देणे गरजेचे असते. असे मत मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे यांनी व्यक्त केले. माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे यांचा 7 जून रोजी प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिर येथे अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक न्यासाचे हेगडे हे अध्यक्ष होते. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून या अमृत महोत्सवी सोहळ्यात विषेश सन्मान आणि शुभेच्छा देण्यात आल्या.गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर, श्रद्धा जाधव, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, मनसे नेते बाळा नांदगावकर, भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रसाद लाड, काँग्रेस महिला आघाडीच्या चित्रा वाघ आदी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्याचबरोबर अभिनेते शिवाजी साटम यांच्यासह कला, शिक्षण क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. डॉ. हेगडे यांना मराठी व्यावसायिक व्यापारी मित्र मंडळातर्फे जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. जीवन गौरव पुरस्कार हा एक सन्मान आहे. परंतु, समाजासाठी केलेल्या महान कामगिरीबद्दल सरकारने डॉ. हेगडे यांना पद्मश्री पुरस्कार द्यावा, यासाठी आपण सरकारला विनंती करणार असल्याचे यावेळी भाजपचे प्रसाद लाड म्हणाले.

यावेळी अनाथ मुलींसाठी काम करणाऱ्या काळाचौकी येथील 'माझे माहेर' या संस्थेला डॉ. हेगडे यांनी 11,111 रुपयांचा धनादेश मदतनिधी म्हणून दिला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.